सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ Program Photo


आज स्त्री शिक्षणाची बीजे रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देऊन ''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' असा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथूनच देशातल्या शिक्षणाचा पाया रचला. समाजाचा स्त्री शिक्षणास विरोध असण्याच्या काळात सावित्रीबाईंनी पुण्यात स्त्री शिक्षणाच्या शाळा काढल्या. सनातन्यांचा कडवा विरोध सहन करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला.त्यामुळे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे यथोचित असून, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जगभरात उल्लेख केला जाईल.



Source of Information