माणमध्ये पाणी नाहीतर कृषीपंप वीजकनेक्शन कशाला ? हे सातारा जिल्हाचे पालकमंत्री यांनी दिलेले उत्तर आवाक करणारे आहे .काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मी,"माण तालुक्यात 2012 पासून शेतकऱ्याना कृषी पंपवीज कनेक्शन दिली नाहीत.ह्या पेंडिंग कनेक्शनचा आकड़ा 1100 आहे. दुष्काळी माणमध्ये पाऊस झाला नाही आणि कृषीपंपाची कनेक्शनही मिळत नाहीत.त्यामुळे माणमधला शेतकरी अडचणीत आला आहे " हे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी मला हे उत्तर दिले. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे....पण असे असेल तर जगणार कसा ??