Home
Jyotiba Phule Gallery
Upcoming Events
Directory
"प्रथम वर्धापन दिन व स्नेह मिलन सोहळा" 01-01-2013
"युवा माळी फाऊनडेशन" र. नं. महाराष्ट्र /४९६/१२ अमरावती /एफ-१९४८० माझ्या सर्व युवा माळी समाज तरुण तरुणीनो ......!!!! आपणास विद्वत चं आहे कि दरवर्षी माळी समाजा चे विविध उपक्रम हे आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच शहरामध्ये होत असतात. त्याच आधारे आपल्या माळी समाजातील युवा एकत्र येऊन माळी समाजा प्रती सामाजिक जवाबदारी पेलण्याची वेळ आली आहे... अमरावती परिसरातील वेगवान जीवन, आर्थिक ओढाताण, कामाचा व्याप, संपर्काचा अभाव, एकमेकातील सुर-दुर अंतर यामुळे या परिसरातील समाजबांधवांना इच्छा असुनही सतत संपर्कात राहता येत नाही. या निमित्याने सामाजिक प्रश्नांची उकल करणे साठी विचारांची देवाण घेवाण करता येईल. या करिता अमरावती जिल्ह्यामध्ये तसेच अमरावती शहरामध्ये "युवा माळी फाऊनडेशन" या नावाने एका चळवळ युवा माळी समाजाच्या तरुण तरुणी च्या संघटने च्या माध्यमातून चालवण्याचा मानस आहे.जेणे करुन समाजाच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून करून आपला युवा माळी संघटन तथा आपल्या माळी समाजा प्रती सामाजिक जवाबदारी आपण यशस्वी करण्या चा प्रयत्न करू व तसेच आपल्या युवा समाजातल्या तरुण तरुणीना एकत्र आणून आपल्या युवा माळी समाजाची ध्येये व उदिष्टे पूर्ण करता येईल ...! * *ध्येय आणि उद्दिष्टे* * १) सर्व शाखेतील युवा माळी सामाज समाज बांधवांचे एकत्रीकरण. २)युवा माळी सामाज बांधवांना नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे. ३) जागतीकीकरणाच्या उंबरठ्यावर युवा माळी समाजाचे सशक्तीकरण. ४) युवा माळी सामाज बांधवांचे व्यावसायिक ,शैक्षणिक ,सामाजिक व व्यक्तीगत प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे एक व्यासपीठ. ५) सर्व समाज बांधवांच्या सुख-दुख:च्या हाकेला धावुन जाणारी संघटना-एक लक्ष्य. ६) सर्व युवा माळी सामाज बांधवांमध्ये एकोप्याची भावना जाग्रूत करणे. ७) समाजातील तळागाळातील बांधवांना त्यांच्या पाल्यांना उच्चशिक्षण , व्यावसायिक शिक्षण व वैद्यकीयशिक्षणा कडे प्रव्रुत्त करणे तसेच त्यांच्याशी संवाद साधणे व त्यांना मदतीचा हात देणे . ८ )सांस्कृतिक , शैक्षणिक , बौद्धिक , विविध स्पर्धा व उपक्रम घेऊन बाल व युवा माळी समाज बांधवांच्या सुप्त गुणास वाव देणे . ९ )सर्व युवा माळी सामाज बांधवांना शासकीय व निमशासकीय नोकऱ्या च्या संदर्भात मार्गदर्शन करणे. १०) विविध शैक्षणिक अभ्यासक्रम यांच्या प्रवेश पुर्व परीक्ष्या व संपुर्ण अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन तज्ञा कडून करणे. अमरावती जिल्हा व अमरावती शहर परीसरातिल राहणाऱ्या माळी सामाज बांधवाना या चळवळी मध्ये सामील होण्यासाठी आम्ही आग्रही राहू ..!! तसेच अमरावती जिल्ह्य तसेच अमरावती शहर परिसरात राहतात अशा व्यक्तींचे मोबईल नं. क्रुपया संयोजकांना कळवा. जेणे करुन आपल्या समाज बांधवांना एकत्र आणुन संस्थेचे उद्दिष्टे पुर्ण त्वास नेऊन संघटन अधिक मजबूत करण्यास मदत होईल. संयोजक :- अजिंक्य खेरडे -९७३००६८२९० , पंकज आकोटकर -९९२११३०६०३ रोशन हाडोळे -९७६६७९०९७५ नितेश भेले -८०८७२८४६४८ मयूर तडस- ८२७५२८५३५४ निशांत बुरनासे -९९७०९६५२६२ अक्षय नाल्हे -९५६१४४५५४४ आशिष पेठे -९०९६४६०११६ सचिन बुरनासे -९५६११०१४१० मृणाली पोपळघाटे - ९९७०८५३४८८ मयुरी खेरडे -८२३७५७५४०८ खुशबू मालधुरे -९७३०१७८७१०
More Details